८ मार्च च्या महिला दिनानिमित्त संजीवन गुरुकुलमध्ये श्रीम. श्रीनिधी सावंत हिचा व्यक्तीपरिचय कार्यक्रम आयोजित केला होता.
श्रीनिधी ही गुरुकुल ची माजी विद्यार्थिनी असून तिने स्वबळावर आपला *क्राफ्ट बिझनेस* सुरू केला आहे आणि या व्यवसायामध्ये ती उत्तरोत्तर अधिक प्रगती करीत आहे. श्रीनिधीच्या कार्यापासून विद्यार्थ्यांनी प्रेरणा घ्यावी, स्वावलंबन शिकावे, स्वविकास साधावा, हा या कार्यक्रम आयोजनामध्ये हेतू होता. विद्यार्थ्यांनी श्रीनिधीला तिच्या व्यवसायाचे स्वरूप, व्यवसाय करताना आलेल्या अडचणी व्यवसायाला प्रेरणा कशी मिळाली, यासारखे प्रश्न विचारून अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला. श्रीनिधीने सर्व विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे दिली आणि विद्यार्थ्यां मध्ये चैतन्यमय वातावरण निर्माण केले. कलेला, बुद्धी आणि मेहनतीची जोड दिल्यास, आपली आवड लक्षात घेऊन त्यातून आर्थिक विकास कसा साधता येतो हे श्रीनिधी च्या बोलण्यातून सर्वांना लक्षात आले. याच कार्यक्रमामध्ये प्रबंधक सौ. नाईक मॅडम यांनी विद्यार्थ्यांशी मुक्त संवाद साधला.आईला घरकामात कोण मदत करते? कोणत्या प्रकारची कामे करता? अशा प्रकारचे प्रश्न विचारून आईच्या घर कामाविषयी आदरभाव ठेवावा ही भावना निर्माण करण्याचा प्रयत्न केला. जे विद्यार्थी घरकामात मदत करतात अशा मुलांचे कौतुक केले.या संवाद कार्यक्रमातून विद्यार्थ्यां विषयी अधिक घरगुती माहिती निश्चितच मिळाली.तसेच दिनेश दादा यांनी गुरुकुलातील सर्व ताई ना भेटवस्तू देऊन त्यांच्या प्रति आदरभाव व्यक्त केला.